बोदवड तालुक्यातील वरखेड बु येथे विजेच्या जोरदार शॉक लागून शेतकऱ्याच्या मृत्यु.
बोदवड:दि. १४ जुलै २०२२
प्रतिनिधि सतिश बावस्कर.
बोदवड तालुक्यातील वरखेड बु शेतकरी गोपाळ रामधन हाडपे वय 32 विहिरी वरील विद्युत मोटर चालू करीत असताना अचानक स्विच बोर्डात करंट उतरले विजेचा जोरदार शॉक लागून शेतकऱ्याच्या बुधवारी दुपारी १/१५ मिटानी जागीच मृत्यू झाला गोपाळ रामधम हडपे असे मुक्त शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ रामधम हाडपे यांची बोदवड तालुक्यातील वरखेड बुद्रुक जंगला लगतच शेतजमीन असून मयत गोपाळ व त्यांचे वडील बुधवारी सकाळी जनावरांना व मेंढ्यांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले होते त्यावेळी अचानक बोर्डात करट उतरल्याने गोपाळ हडपे यांना विजेचा जोरदार शॉक लागला वडील थोड्या अंतरावर उभे होते.ते गेले तोपर्यंत मुलगा खाली पडला आणि त्यांनी तातडीने गोपाळला गोंधळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून संध्याकाळी वरखेडे येथे त्याच्यावरील अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी मुलगी वय ६ मुलगा ३ वर्ष आहेत.
आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे बोदवड पोलिस स्टेशनात विजय भास्कर हाडपे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस नाईक उदल चव्हाण करीत आहे.