नाशिक
नाशिक येथे भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक आढावा बैठक संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नुकतीच राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. बाळासाहेब सानफ, नाशिक महानगराध्यक्ष गिरीश पालवे आदिंचा प्रमुख उपस्थितीत वसंत स्मृती भाजपा कार्यालय नाशिक येथे संपन्न झाली.
राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डाॅ. भारतीताई पवार यांचे आगमन प्रसंगी स्वागत सत्कार प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केला. बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील प्रभारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, विविध मोर्चा, आघाड्याचे पदाधिकारी, संयोजक, सहसंयोजक आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.