गोंडगाव परिसरात पशु धनाची मोठ्या प्रमाणात चोरी ; शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण
भडगाव (प्रतिनिधी) परिसरातील घुसडी कनाशी कजगाव वाडे गोडगाव बोरणार दलवाडे शिवारात मोठ्या प्रमाणात पशुधनाची चोरी होत असून शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
या दिनांक 21 मार्च रोजी कोळगाव शेत शिवार विजेचा टाईम दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत होता त्यानंतर पाणी भरून शेतकरी घराकडे निघाले व रात्री बारा एक दरम्यान पशुधनाची चोरी झाली. गोंडगाव येथील त्र्यंबक सदाशिव पाटील व लोन पिराचे येथील भाऊसाहेब ऐकनाथ पाटील यांच्या शेतात न गायींची चोरी झाली. विशेष म्हणजे शेतात म्हैस, बैल, प्राणी असताना फक्त गायींची चोरी कशी झाली असा तर्कवितर्क लढवले जात आहे आणि चोराला कस काय माहिती की रात्री दहा वाजेपर्यंत लाईट आहे. यासंदर्भात अनेक तर्कवितर्क यांना विराम येत असून या चोरी मागे मास्टर माईंड कोण ?. यापूर्वीही गोंडगाव गावातील अनेक गाई चोरी झाले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तपास लागला नाही. कुणाच्या शेतात गाई आहेत हे चोरांना कसे समजले यासाठी चोरांना परिसरातील कोणी मदत तर करत नसेल ना असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत भडगाव पोलिस स्टेशन त्वरित चोराला अटक करावी, अशी मागणी होत आहे.