श्री महाराणा प्रताप जयंती निमित्त अमळनेरात अभिवादन
अमळनेर : हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप जयंती निमित्त अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी सामूहिक पूजन व माल्यार्पण करण्यात करण्यात आले.
यावेळी शहर व ग्रामीण भागातील राजपूत समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,सर्वांनी राणा प्रतापांचा प्रचंड जयघोष केला. अमळनेर तालुका राजपुत समाज पंच मंडळाने हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आगामी जून महिन्यात महाराणाजींची तिथीनुसार येणारी जयंती प्रचंड उत्साहात जाहीर करण्यात येईल असे पंच कमिटीच्या वतीने घोषित करून तयारीसाठी सर्वांनी कामाला लागावे असे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी राजपूत समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रणजित भिमसिंग पाटील, शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील,तसेच नरेंद्रसिंग ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी, भरतसिंग पाटील, अमळनेर बाजार समितीचे संचालक जितेंद्र राजपूत, अँड दीपेन परमार, पत्रकार चेतन राजपूत, अजयसिंग पाटील, राजुसिंग परदेशी, अनिलसिंग पाटील, प्रदीप राजपूत, दिनेशसिंग राजपूत, गोटू राजपुत, रणजितसिंग राजपूत, सूरज परदेशी, विलाससिंग पाटील, अमोल राजपूत, स्वर्णदीप राजपूत, कुणाल गिरासे, हर्षल परदेशी, राजेंद्रसिंग पाटील, महेश राजपूत, सामाजिक संस्थांचे ट्रेनर किशोर अहिरराव, रामलाल पाटील, नितीन राजपूत, जयराम पाटील, दीपक पाटील, डॉ ज्ञानेश्वर पाटील, रघुनाथ पाटील, अरुण पाटील(लोणे), गोविंदा पाटील, रमेश पाटील, अरुण पाटील(रामेश्वर), सतिश पाटील, दिनेश पाटील यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.