रमेश देव यांचे जळगावशी जुळलं होतं प्रेम व जिव्हाळ्याचं नातं
आता उरल्या केवळ आठवणी, बहुआयामी कलावंताच्या भूमिकांना जळगावकरांनी दिला चांगला प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटविणारे अभिनेते रमेश देव यांचे काल ह्दयविकाराने निधन झाल्याचे वृत्त येताच जळगाव शहरातही त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.रमेश देव व त्यांच्या पत्नी,अभिनेत्री सीमा देव व अभिनेता अजिंक्य देव यांचे जळगावशी प्रेम व जिव्हाळाचं नातं निर्माण झाले होते.रमेश देव व सीमादेव यांनी जळगावला चार- पाच वेळा भेटी दिल्या होत्या.तो काळ 1980 ते1990 चा होता.त्याच काळात शहरातील ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांनी रमेश देव यांची सिने जर्नालिस्ट म्हणून तीन-चार वेळा वृत्तपत्रासाठी विशेष मुलाखती घेतल्या होत्या व त्या जनशक्तीच्या चित्रपटविषयक चित्ररुप पुरवणीत प्रसिध्द झाल्या होत्या.त्या मुलाखतींचे रमेश देव व सीमा देव यांनी कौतुक केले होते.
रमेश देव यांचे अनेक मराठी व हिंदी चित्रपट ज्या ज्या वेळी जळगावातील चित्रपटगृहांमध्ये झळकले त्या-त्या वेळी त्यांच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती.त्यांच्या नाटकांनाही रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.त्यांच्या जळगाव भेटीदरम्यान रमेश देव यांच्यातील अभिनेत्याबरोबरच त्यांची साधी राहणी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी जळगावकरांची मने जिंकली. रमेश देव यांच्या आवाजात दमदारपणा होता व त्यांची संवादफेक रुबाबदार होती.मराठीबाणा असलेल्या रमेश देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा जास्त हिंदी चित्रपटातून भूमिका साकारल्या व रसिकांनीही त्यांना डोक्यावर घेतले. जळगावातील नूतन मराठा विद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी ते 1980-81 मध्ये प्रथम आले होते.त्यानंतर सामाजिक कृतज्ञता निधीसाठी आयोजित नाटकाच्या निमित्ताने ते 1985-86 मध्ये शहरात आले होते. त्यांचे जळगावात अनेक जवळचे मित्रही होते. नेहरु चौकातील टुरिस्ट हॉटेलमध्ये ते थांबत असत. भोजनात त्यांना खान्देशी पदार्थ देण्यात येत होते. त्यामुळे त्यांना त्या पदार्थांची चांगली भुरळ पडली होती.
‘देव’ हे आडनाव कसे रुढ झाले
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला.ते मुळ राजस्थानीतील जयपूरचे,ठाकूर घराण्यातील.राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव ‘देव’ झाले.एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती.तेंव्हा महाराज म्हणाले की,तुम्ही देवासारखे धावून आलात,तुम्ही देव आहात.तेंव्हापासून ‘देव’हे नाव रुढ झाले,ते कायमचे