नंदुरबारात श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा
नंदुरबार : शहरातील सीबी पेट्रोलच्या मागे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून उद्या महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
शहरातील सीबी पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नव्यानेच श्रीराम मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे. या मंदिरात प्रभू श्रीराम, गणपती व हनुमान मूर्तीची आज रविवारी सकाळी १० वाजेपासून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालेले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पूजा विधि शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येईल.
उद्या सोमवार दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून भंडारा वितरित करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेवक मदनलाल जैन, उद्योजक मनोज रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र चंदरमल जैन यांनी केले आहे.