जळगाव जिल्हा

सी गो पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

जळगाव (प्रतिनिधी) सी. गो. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश साळुंके यांनी कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जीवनपट सांगून त्यांच्या साहित्याची, त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची व मराठी भाषेला समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळऊन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनविषयी माहिती सांगितली तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात तिची गळचेपी थांबवण्यासाठी मराठी भाषिक म्हणून आपण तिचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विश्वास भामरे यांनी मानले. यावेळी उपप्रचार्य डॉ. अनंत पाटील, पर्यवेक्षक प्रा. डी. पी. पाटील,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे