कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध ; हिजाबच्या सन्मानार्थ मुक्ताईनगर येथील महिला सक्रिय
मुक्ताईनगर (सचिन झनके) नुकताच महाराष्ट्रमध्ये सर्वत्र पसरले जाणारा वायरल व्हिडीओ आपण सर्व लोकांनी बघितलेला आहे. त्याचे सर्वत्र आपल्याला माहिती मिळालेली आहे. कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांनी हिजबला बंदी केल्याने कर्नाटक मध्ये एक धाडसी मुलीने प्रत्युत्तर दिले. कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये मुस्लिम बांधवांनी व महिलांनी तीव्र निषेध नोंदवून तहसीलदारांना व मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे खताळ निवेदन दिले.
सदर निवेदनामध्ये भारत हा स्वतंत्र देश आहे सर्वांना राहण्याचा जगण्याचा बोलण्याचा संचार करण्याचा कुठेही शिक्षण घेण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. परंतु आज जे घडत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. देशात विविध ठिकाणी हिजाबा विरोध दर्शवून काही नागरिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत आहेत. ज्या पद्धतीने भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकामध्ये म्हटले आहे. समता, स्वातंत्र, गणराज्य, सामाजिक आर्थिक राजनीतिक सर्वांना समान अधिकार देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार त्या अधिकारांवर ती कुठेतरी दगा येताना दिसून येत आहे. भारत देशातील विविध नटलेल्या सांस्कृतिक वारसा जोपासणारा देश म्हणून पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तसंच मुस्लिम विद्यार्थीला हिजाब घालून येऊ नये असे म्हणणे चुकीचे आहे. अशा निष्कृष्ट विचारसरणीच्या लोकांचा सरकारने दखल घ्यावी हीजाब मुळे ऊन प्रदूषण कोरोना सारख्या रोगापासून संरक्षण होते. हिजबाला बंदी म्हणजे महिलावर्गाचा अपमान होय अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून सरकारला केली आहे. लवकरात लवकर यावर ती कारवाई करण्यात यावी. निवेदन देताना मशिरा बी शेक, चाद बी,मुस्कान बी, शेख मुकासुद, लुकमान बेपारी, शिवसेना अल्पसंख्यांक संघटक अफसर खान, जिल्हा उपाध्यक्ष मनियार बिरादरी हकीम आर चौधरी व इतर समाज बांधव उपस्थित होते.