भोटा येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची जयपाल बोदडेंनी केली पाहणी
मुक्ताईनगर (सचिन झनके) तालुक्यातील भोटा येथील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जळगाव तसेच पंचायत समितीचे प्रभारी सभापती मुक्ताईनगर जयपाल बोदडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करून या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील यांनी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांचे आभार व्यक्त केले. व अजून अपेक्षेच्या दृष्टिकोणातून संविधान सभागृहाची मागणी केलीयावरती समाज कल्याण सभापती जयपाल भाऊ यांनी त्यांना सदर माहिती दिली. ज्या पद्धतीने समाजातील लोकांच्या मागण्या येतील त्या पद्धतीने त्यावर ती पूर्णपणे खर्च हा केला जाईल व करत राहणार. याप्रसंगी भोटा येथील उपसरपंच भास्कर कदम, पोलीस पाटील निनाजी लोखंडे, प्रकाश इंगळे, विनोद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असून आभार व्यक्त केले. काही मागण्या सुद्धा करण्यात आले आहे.