रेतीचे अवैध वाहतूक करणारे डंपर पकडले ; मुक्ताईनगर तहसिलदार यांची कडक कारवाई
मुक्ताईनगर (सचिन झनके) कुऱ्हा (रुपेश माहुरकर) रेतीचे अवैध वाहतूक करत असलेल्या डंपर चारठाणा बोदवळ मुक्ताईनगर या मार्गाने सतत वाहतूक होत असलेली नजर कैद झाले. मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांनी जागेवरती अवैध वाळू चे डंपर पकडले आहे.
बोदवड येथील रेशन दुकानाची तपासणी करून परत जात असलेल्या तहसीलदार श्वेता संचेती यांनी सदर अवैध पद्धतीने डंपर मध्ये वाळू घेऊन जात आहे असे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यावरती कुऱ्हा व मुक्ताईनगर रस्त्यावर चारठाणा फाट्याजवळ अशोक लेलँड कंपनी नंबर प्लेट नसलेले डंपर त्यांच्या नजरेस आले. त्यांनी डंपर चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तोवर डंपर चालक ड्रायव्हर चावी घेऊन धूम पळत सुटला आणि यावेळी तहसीलदार श्वेता संचिती यांनी डंपर मध्ये बसलेल्या दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुक्ताईनगर येथे नेले. चालक चावी घेऊन गेल्याने बंद असलेला डम्पर तलाठी संतोष गायकवाड, तलाठी नाईक , कोतवाल मिथुन मुडाळे यांना दुसऱ्या वाहनाच्या साह्याने मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये नेले. सदर डंपर चालकांनी डंपर मधील रेती सुकळी येथे खाली केल्याचे असे तलाठी यांच्यावर कबुली घेतली. त्यामुळे सदर मुक्ताईनगर मधील वाळू माफिया यांच्या वरती एक कडक कारवाई या ठिकाणी आपल्याला प्रशासकीय कामकाजात दिसून येत.


