वडोदा वनपरिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, वन विभागाचे दुर्लक्ष ; वर्ण प्राण्यास पाणी नाही
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) वडोदा वनपरिक्षेत्र मध्ये वन्यप्राण्यांचे पाणवठे नदी-नाले उन्हामुळे पूर्णपणे आटत आहे. वन्य प्राण्यांना पाणी न मिळाल्याने त्यांची भटकंती वाढत चाललेली आहे. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत चाललेले आपल्याला दिसून येत आहे. तसेच त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांची जीव जाण्यास धोका निर्माण होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी यांची वन विभागाचे दुर्लक्ष असे आरोप वन्य प्राणी प्रेमी करत आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे वन्यप्राण्यांसाठी भरघोस निधी दिला जातो. त्या अनुषंगाने वन्यप्राण्यांसाठी पाहिजेल त्या उपाय योजना राबवल्या येणे. वन्यप्राण्यांसाठी पाणवठे यावर भरपूर खर्च करण्यात आलेला आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र यांचे पाणी टाकण्याचे काम करत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनपेक्षित भेट असल्याने पानट यामध्ये रातोरात टँकरने पाणी सोडण्यात आलेले या ठिकाणी वन्य प्राणी प्रेमी आरोप करत आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडलेले असून स्थानिक वरिष्ठ अधिकारी जंगलात जाण्याचे कष्ट घेत नाही. त्यामुळे सातपुडा पर्वत रांगातील वन्य प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर ती आहे. प्राणीप्रेमी यांचा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावरती गंभीर आरोप. वन विभागातील वन मजूर व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर ती कठोर कारवाही होण्यात यावी अशी मागणी प्राणीप्रेमी यांनी केली.