जळगाव जिल्हा
जगद्गुरु रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती चर्मकार समाजाच्या वतीने थाटामाटात साजरी
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर चर्मकार समाजाच्या वतीने चर्मकार समाजाचे आराध्य दैवत रोहिदासजी महाराज यांची जयंती गुरू रोहिदास महाराज मुक्ताईनगर येथे साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते रोहिदास महाराजांची प्रतिमेची पुष्प अर्पण करण्यात आली. त्यानंतर चर्मकार समाजाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. व कार्यक्रमासाठी तालुका काँग्रेस पार्टी, मुक्ताईनगर सामाजिक राजू जाधव, व काँग्रेस तालुका कमिटीचे इतर कार्यकर्ते आदी उपसथित होते.