गुन्हेगारी

पतिचा खून करुन पुरावे नष्ट करणारी पत्नीस अटक

भुसावळ (प्रतिनिधी) एका वर्षापूर्वी पत्नीनेच पतिचे निर्घृणपणे खून करुन तसेच खुनाचे पुरावे नष्ट करुन आत्महत्याचे बनावटी कट रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे (भुसावळ) यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही घटना आत्महत्या नसून सदर व्यक्तिचे खून करण्यात आले ही बाब उघडकीस आणली व आरोपी पत्नीस अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गणेश महाजन व सीमा महाजन हे दाम्पत्य लक्ष्मी नारायण नगरात वास्तव्यास होते. गणेश महाजन याला दारुचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीशी वाद घालणं, मारहाण करणे हे नित्याचं झालं होतं. गणेश महाजन दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी सीमा हिने त्याला दोन दिवस जेवण दिलं नाही. त्यानंतरही दि. ४ ऑगस्ट २०२० रोजी गणेश असाच दारू पिऊन घरी आला. याच संतापाच्या भरात सीमा महाजन हिने नायलॉनची दोरी गणेशच्या गळ्याला आवरून त्याचा खून केला. त्यानंतर सीमा महाजन यांनी पुरावे नष्ट करुन पतीने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तिने सर्वांना भासवलं. दि. ४ ऑगस्ट २०२० रोजी भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनात सुमारे सांय‌. ७:०० वा. गु.र.न. ३३/२०२० प्रमाणे गणेश प्रभाकर महाजन व.५० रा. लक्ष्मीनारण नगर भुुुसावळ याची अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, अपमृत्यू झाल्याच्या चौकशीमध्ये वैदकिय अधिकारी यांचा अभिप्राय व आरोपी व साक्षीदार यांची चौकशी केल्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सीमा महाजन हिला अटक करुन दि.२६ डिसेंबर २०२१ रोजी तिचा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे