जळगाव जिल्हा

पोदार जिनिअस इंटरनॅशनल स्कूल,जामनेर शाळेत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ व ‘बालिका दिन’ महिला गौरवाने साजरा

०४ जाने २०२२, जामनेर : जामनेर ता. प्रतिनिधी ईश्वर चौधरी

सविस्तर वृत्त असे की, जामनेर शहरातील नावारूपास आलेली पोदार जिनिअस इंटरनॅशनल स्कूल विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली ओळख निर्माण करीत आहे. जिनिअस स्कूल स्त्री-शिक्षणाच्या उद्गात्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ व ‘बालिका दिन’ *Women’s Empowerment Week’* म्हणुन साजरा करीत आहे. सदर आठवडाभर शाळा समाजातील विविध क्षेत्रात सेवा देत असलेल्या तसेच काम करीत असलेल्या महिलांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार व त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहे.

यामध्ये डॉक्टर, वकील ,पोलीस, पत्रकार, शिक्षिका, इंजिनिअर, औद्योगिक तसेच कला क्षेत्रातील महिला, विविध शासकीय कार्यालयात सेवा देणाऱ्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय सैन्यदलातील जवानांच्या पत्नी, कुठलाही आधार नसताना समाजात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिला अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान व त्या देत असलेल्या सेवा व कार्याबद्दल त्यांचा सन्मान या आठवडाभरात शाळेतर्फे करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आज दुसर्या दिवशी वकील,पोलिस व पत्रकार महिला यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रसंगी *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व प्रथम भारतीय महिला वकील कॉर्णालिया सोराबजी व पहिल्या भारतीय महिला वृत्त निवेदिका* यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यांनतर आमंत्रित सर्व महिला मान्यवरांचे स्वागत व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.

 


कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन सौ.दीपाली सुरवाडे,महिला वकील,शाळेच्या डायरेक्टर सौ.प्रज्ञाताई पाटील,महिला पत्रकार सौ. मिनल चौधरी (अँकर,JBN News), सौ.अश्विनी चौधरी (अँकर,GM News) मिना शिंदे (एडिटर,महा.जनता न्यूज),सौ.मनिषा दमन,महिला होमगार्ड, शाळेचे प्रिंसिपल जोमोन जॉन सर, शिक्षक तसेच शिक्षकेतर वर्ग आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे