महाराष्ट्र
फर्दापूर येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
फर्दापूर (विवेक महाजन) फर्दापूर येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने शनिवार (दि.16) रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, उस्मानखा पठाण, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, शिवाप्पा चोपडे, सोयगाव शहर प्रमुख संतोष बोडखे, रविंद्र बावस्कर, विलास वराडे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.



