जळगाव जिल्हा

शहीद शिरिषकुमार मित्र मंडळातर्फे पर्यावरण पूरक होळी

लाकूड रहित होळी केवळ शेणाच्या गोवऱ्या, कापडांच्या चिंध्यांचा वापर ; 32 वर्षांपासून उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) केवळ झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा न करता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाची परंपरा 32 वर्षांपासून यंदाही कायम आहे. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी केवळ शेणाच्या गोवऱ्या, कापडी चिंध्या जाळून इकोफ्रेंडली होळी करण्याची परंपरा येथील शिरीषकुमार मित्र मंडळाने जिल्ह्यात कायम राखली आहे. इको फ्रेंडली होळी चे यंदा 32 वे वर्ष आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना अनेक हौशी दरवर्षी होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करतात मात्र शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे सन 1990 पासून लाकूड रहित होळी साजरी करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी मंडळ गेल्या 32 वर्षांपासून कार्यरत आहे. होळीमध्ये शेणाच्या गौवऱ्या जुन्या-नव्या कापडाच्या चिंध्या वापर करण्यात येत आहे या होळी द्वारे सामाजिक संदेश देण्यात येतो. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात येते.

वृक्ष पूजनतून पर्यावरणाचा संदेश

दर वर्षी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळतर्फे बालवीर चौकात होळी प्रज्वलित होण्यापूर्वी परिसरातील सुवासिनी महिला आणि बेटी बचाव अभियाना अंतर्गत शालेय तसेच महाविद्यालयीन युवतींच्या असते तुळशी, आंबा, कडूनिंब, पेरू आदी वृक्षांची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर या रोपांची लागवड करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात येते. या उपक्रमाची दखल घेऊन निसर्ग मित्र समितीतर्फे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद अंतर्गत 2019 मध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

जल बचतीतून प्रबोधन

धुलीवंदन किंवा रंगपंचमीला घातक व रासायनिक रंगाचा वापर टाळला जातो. धुलीवंदन निमित्त होणारी पाण्याची नासाडी थांबवून जलबचत बाबत संदेश दरवर्षी मंडळातर्फे देण्यात येतो. या राष्ट्रीय उपक्रमात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्यासह संजय चौधरी, डॉ. गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, गोपाल हिरणवाळे, किशोर गवळी, प्रफुल्ल राजपूत यांचा सहभाग असतो. नंदनगरीच्या एतिहासिक बालाजी वाडा येथील मानाच्या होळीतून मंडळाचे कार्यकर्ते गोपाल हिरणवाळे मशाल पेटवून आणतात. त्यानंतर बालवीर चौकातील होळी त्या मशालीच्या साह्याने प्रज्वलित करण्यात येते. व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी गुटख्याच्या पुड्या आणि दहशतवाद भ्रष्टाचार आधी फलकांचे प्रतीकात्मक दहन करण्यात येते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे