गुन्हेगारी

सावधान ! एजंट मार्फत पत्नी आणाल तर तुम्हाला जिवे मारू शकते ; पाचोऱ्यात घडली रक्तरंजित घटना

बापाने स्वतःच्या मुलीचा जीवनाचा केला पोरखेळ वर्षभरातून केला तिचा चौथा विवाह

पाचोरा (प्रतिनिधी) मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वडीलांसोबत माहेरी पाठवण्यास नकार दिल्याने बापलेकीने डाव साधून पाण्यातून गुंगीचे औषध देत मध्यरात्री मारहाण करीत बाप-लेकीने धिंगाणा घातल्याची घटना पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बापलेकी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन विवाहितेस जळगाव येथील बालसुधारगृहात रवानगी केली असून विवाहितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत राहणारे अर्जुन उखा पाटील यांचा मुलगा राहुल याचा विवाह दि. ९ मार्च २२ रोजी पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथील पल्लवी उर्फ कडूबाई हिच्याशी झाला. पल्लवी हिचे वडील साहेबराव सांडु मस्के मुळ रा. म्हसले साबळेवाडी ता. बदनापुर जि.जालना येथील मूळ रहिवासी आहे. विवाह झाल्यानंतर पल्लवी हीला पाचोरा येथे घरी आणले. दि २५ मार्च २२ रोजी सुनबाई पल्लवीला करमत नसल्याने तिने वडिलांना बोलावून घेतले. आता मुलीला माहेरी घेऊन जातो असे साहेबराव महस्के याने बनाव करून जावई व अर्जुन पाटील यांना आग्रह केला. मात्र सुनबाईला पाठवत नाही. असे त्यांना समजले. मग त्यांनी मध्यरात्री कटकारस्थान घडवून आणले. व त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. व त्यांना रक्त बंबाळ केले. व त्यांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर बाप लेकीला पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला जळगाव येथील बालसुधारगृहात रवानगी केले असून मुलीच्या बापाला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे.

अशी घडली घटना

सदर पल्लवीने दोन दिवसापूर्वी सासरे व पती बाहेरगावी गेल्याने त्याचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. घरी सासूला शौचालयास जात आहे. असे सांगून ती निघून गेली तिला जाऊन दीड तास झाला होता. तेव्हा सासूला संशय आला असता तीने शेजाऱ्यांना सांगितले तेव्हा शेजाऱ्यांनी सगळीकडे शोधा शोध करत शेवटी बस स्टॅन्ड मध्ये दिसून आली. त्यानंतर तिला घरी घेऊन आले असता याचा राग धरून मुलीच्या वडिलांनी व मुलीने रात्रीच सासरच्या मंडळीचा काटा काढण्याचे ठरविले. दि २७ रोजी रात्री सुनबाई पल्लवीने पाण्यातून पती व सासू-सासरे यांना गुंगीचे औषध दिले.

सदर साहेबराव महस्के यांनी सदर मुलीचा चौथा विवाह एकाच वर्षात केल्याचे तपासात आढळले. एजंट मार्फत आंतरजातीय विवाह करून फसवणूक करीत लाखोंची लूट करत असल्याचे उघडकीस आले आहे. मध्यरात्री १.३० वाजता अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आली. गुंगीचे पाणी पाजूनही यांना जाग कशी आली हे पाहुन सुनेने व तिच्या बापाने लोखंडी गजाने पती राहुल व सासु सासरा यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारले. जखमी पती, सासरा, सासू या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे