अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन
नंदुरबार (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर (राज्यमंत्री) यांचा नंदुरबार दौऱ्यावर आले असता जिल्हा परिषद नंदुरबार याहा मोगी माता सभागृह येथे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
अप्रशिक्षित निमशिक्षकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावुन घेणेबाबत संदर्भ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए -२००९ / प्र.क्र.९० / प्राशि -४ / मुंबई दि . ३१ जुलै २००९ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए -२०१२/ प्र.क्र.२५० / प्राशि -४ मंत्रालय, मुंबई दि.१ मार्च २०१४ सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात एकुण २१७ रुपांतरीत वस्तीशाळा व बंद नाविन्यपूर्ण ” पर्याय शिक्षण केंद्रातील निमशिक्षक एकुण ३२९ असे ५४६ निमशिक्षकांचा उक्त संदर्भ क्र.२ नुसार जिल्हा परिषद सेवेत सामावुन घेणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. परंतु ८ निमशिक्षकांना वेळोवेळी आयोजित केलेल्या शिबिरास हजर राहणे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे , इत्यादी कारणास्तव सदर नियुक्तीची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तथापि उक्त संदर्भ क्र.२अन्वये एकुण ८ निमशिक्षकांपैकी २ निमशिक्षक पत्राद्वारे प्रशिक्षित असून उर्वरीत ६ निमशिक्षक अप्रशिक्षित यांची नावे खालीलप्रमाणे आहे. हिरालाल नाग्या वळवी , जि.प.शाळा थेवापाणी ता . अक्कलकुवा, सायसिंग भिमसिंग वळवी, जि.प.शाळा पाटीलपाडा ता. तळोदा , ३ ) सायसिंग चुंडा पटले ( अप्रशिक्षित ) जि.प.शाळा पाटीलपाडा ( भा.) ता.अक्कलकुवा , ४ ) बामण्या फुलजी तडवी , जि.प.शाळा बारीपाडा ता. अक्कलकुवा, ५ ) रमेश भटा पावरा, जि.प.शाळा अंधारपाडा ता.शहादा, ६ ) जयसिंग चतुर पावरा , वस्तीशाळा कुकलटचा महुपाडा ( काकरदा ) ता.धडगांव , ७ ) करणसिंग इमरमा वळवी , वस्तीशाळा आसनबारीपाडा ता. धडगांव तरी वरीलप्रमाणे निमशिक्षक हे मागील १० वर्षांपासून जिल्हा परिषदेत वेळोवेळी चकरा मारुन देखील प्रशासनाने त्यांना आजपावेतो न्याय मिळवून दिलेला नाही. तरी आपण आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेश देवून जिल्हा परिषद सेवेत सामावुन घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय सादर प्रत ना.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, ना. बच्चुभाऊ कडू, जिल्हाधिकारी, डॉ.हिनाताई विजयकुमारजी गावीत खासदार, नंदुरबार लोकसभा मतदार संघ, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अॅड. सिमाताई पद्माकरजी वळवी अध्यक्षा, अॅड. रामभैय्या चंद्रकांत रघुवंशी उपाध्यक्ष अजितदादा सुरुपसिंगजी नाईक शिक्षण सभापती, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, विकास घुगे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, दिलवरसिंग वळवी, दिलीप वसावे आदी उपस्थित होते.