चोपडा
चोपडा नगरपरिषदेचा अमळनेर नगरपालिकेवर १० गडी राखून दणदणीत विजय
चोपडा (विश्वास वाडे) आज एरंडोल नगरपरिषद आयोजित माझी वसुंधरा प्रेमियर लीग अंतर्गत झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये चोपडा नगर परिषदेने १० गडी राखून विजय मिळून पुढील फेरीत प्रवेश केला. अमळनेर नगरपालिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चोपडा नगरपालिकाचे कर्णधार अविनाश गांगोडे यांच्या अतिशय साचेबद्ध क्षेत्ररक्षणामुळे अमळनेर न प यांना ५ षटकात ५६ धावांवर रोखले. लक्षाचा पाठलाग करताना चोपडा नगरपालिकेचे धुरंदर फलंदाज सचिन वाडे यांनी ३ षटकार मारत २१ धावांची नाबाद खेळी केली तसेच त्यांचे साथीदार जयेश बागरे याने ४ षटकार व २ चौकार मारत ३४ धावांची नाबाद खेळी करत २.१ षटकात चोपडा संघास १० गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. त्याचा चोपडा नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनी जल्लोषात आनंद साजरा केला.