अमळनेर (युवराज पाटील) शहरातील न्यू प्लॉट भागात “न्यू प्लॉट विकास मंच स्थापन झल्याने” आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते मंचच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.डॉ बी एस पाटील, जि प सदस्या जयश्री अनिल पाटील, बजरंगलाल अग्रवाल, डॉ अनिल शिंदे, खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष कल्याण पाटील, संचालक योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल, हरी भिका वाणी, डॉ संदेश गुजराथी, प्रा अशोक पवार, प्रकाशचंद पारेख, अँड एस एस ब्रह्मे, मकसूद बोहरी, प्रा सुभाषचंद्र सोमाणी, गणेश ठाकरे, संजय शिरोडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. संपुर्ण न्यू प्लॉट भागातील जेष्ठ व तरुण मंडळींनी एकत्र येऊन न्यू प्लॉट परिसर विकास मंचची स्थापना केली असून यामाध्यमातून परिसरातील, विकासकामे, समस्यां, नागरिकांच्या अडचणी मार्गी लावून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.सदर मंचच्या निर्मिती बद्दल आ.अनिल पाटील यांनी कौतुक करत या मंचला सर्वतोपरी सहकार्य व मदत देण्याची ग्वाही दिली. तर उपस्थित मान्यवरांनी देखील शुभेच्छा दिल्यात. यावेळी डॉ संजय शाह यांनी मंचची कार्यकारिणी घोषित केली. याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळ, अर्बन बँक आणि विविध राजकीय व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी बांधव,महिला व युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
मंचची घोषित कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष-चेतन राजपूत, उपाध्यक्ष-बिपीन पाटील, प्रविण पारेख, सचिव-महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष-डॉ संजय शाह, कार्यकारिणी सदस्य-प्रसाद शर्मा, पंकज मराठे, हार्दिक खिलोसिया, अँड विवेक लाठी, सौरभ जैन, अजीज बोहरी, तेजेन्द्र जामखेडकर, प्रशांत लंगरे, प्रतीक जैन, हृदयनाथ मोरे,सल्लागार- प्रकाशचंद्र पारेख, बजरंगलाल अग्रवाल, डॉ शरद बाविस्कर, विनोद जैन, किरणकुमार जैन, मकसूद बोहरी, अनिल कासार, रघुनाथ पाटील, अमोल राणे, दिलीप ललवाणी, भरत कोठारी, मयूर सोनार, संजय शिरोडे, प्रेम शाह, वसंत पाटील, पर्यंक पटेल, जयप्रकाश पाटील, अँड एस एस ब्रह्मे.