अमळनेर
शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्या ; घनश्याम पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) दि 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक घनश्याम पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की मागील 2 वर्षापासून कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध लावून सार्वजनिक उपक्रमांना बंदी घालण्यात आली होती, परंतु सध्य परिस्थितीत कोवीड-19 चा प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णसंख्या घटली आहे. तरी शासनाने लावलेले निर्बंध शिथिल करून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत जाणते राजे छत्रपती शिवराय यांचा 19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या शिवजन्मोत्सवा निमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांना बिनशर्त परवानगी देण्यात यावी अशी विनंती घनश्याम जयवंतराव पाटील यांनी केली आहे.