महिलांचे सशक्तीकरण हे समाजाचे ऊर्जास्रोत : सभापती सुनीता चौधरी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई चौधरी यांच्या संकल्पनेतुन मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व महिला सरपंच भगिनींच्या तर राजकीय व सामाजिक कर्तृत्वाचा सन्मान झालाच पाहिजे. या सकारात्मक भावनेतून तालुक्यातील सर्व महिला भगिनी सरपंचांचा सत्कार मुक्ताईनगर तालुका पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. जनतेच्या प्रती असलेली आपली नाळ अत्यंत घट्ट जोडली जावी हा यामागील समाजाभिमुख उद्देश होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार श्वेता संचेती या होत्या तर जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या हस्ते मान्यवर भगिनींना सन्मानपत्र देऊन सर्व महिला सरपंचांचा यशो चित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महिला सरपंच मनिषा देशमुख, पंचायत समिती सदस्य शुभांगीताई भोलाने, सभापती सुनीताताई चौधरी यांनी महिलांबद्दल समाजाची परिस्थिती व वास्तव परिस्थितीची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांनी समाजातील पारंपारिक बदल याविषयीची माहिती दिली. तथा व्हिडिओ संतोष नागटिळक यांनी शिक्षणाच्या प्रवासासाठी स्त्री म्हणजे आपली माता ही महत्त्वाचा दुवा असते त्यामुळेच कुटुंबाचा गाढा हा चालत असतो. तथा सरपंच प्रतिनिधी म्हणून प्राध्यापिका मनीषा देशमुख यांनी समाजातील महिलांनी आपल्यावर असणाऱ्या संपूर्ण जबाबदाऱ्या ह्या अत्यंत अचूक पद्धतीने कशा पार पाडत असता त्याचा कुटुंबाला कसा फायदा होतो हे सांगितले. तर गटविकास अधिकारी यांनी कुटुंबाचा गाभा म्हणजेच आपली आई असते ती एक स्त्री असते तिला संपूर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती असते.
यावेळी सभापती यांनी आपल्या मनोगतात महिलांचे सशक्तीकरण हे समाजाचे ऊर्जास्रोत आहे ते कुटुंबाला प्रत्येक घटकाला न्याय देत असता असे सांगितले. याप्रसंगी या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार यांनी महिलांसाठी घटना दुरुस्ती ही देशाच्या सर्वांगीण विकासाच्या सबलीकरणासाठी पोषक अशी महत्त्वाची घटना आहे. यामधून देशाचा विकास हाच एक हेतू आहे. यासाठी प्रत्येक महीलाने सकारात्मक जीवन जगले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी रंजना पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, शुभांगी भोलाणे, मनीषा देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भुलाने, संत तुकाराम महाराज फाउंडेशनचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पंचायत समिती कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसर्ग मित्र समितीचे तालुकाध्यक्ष प्रशांतराज तायडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी केले.