घोडगाव शिवरातील अफूच्या शेतीवर पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांची धाड ; जिल्ह्यातील सर्वात मोठा मोठी कारवाई
चोपडा (विश्वास वाडे) चोपडा तालुक्यातील घोडगाव शिवारात वाळकी येथील शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात सुमारे तीन बिगे अफूची लागवड केली असून या शेतीवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज धाड टाकली, मात्री रात्रीची वेळ अंधार असल्याने आज सकाळपासून पोलीस कारवाई सुरू केली अफूच्या शेतीची सर्वात मोठी लागवड व पोलीस कारवाई होत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लागवड केलेल्या अफूची किंमत कोट्यावधींच्या घरात असून ही लागवड आजूबाजूला मका लागवड करून त्यामधोमध अफूची लागवड केली आहे. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि.देविदास कुनगर व त्यांच्या टिमने छापा टाकून कारवाई केली. पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांनी प्रथमदर्शनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी चाळीसगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय अधिकारी भास्कर डेरे त्याच्यासोबत पुरवठा अधिकारी नेतकर, कृषी अधिकारी देसाई, आर सी पी प्लाटून पोलिस कर्मचारी असे मोठ्या फोजफाटा सहीत शेतात कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


