तालुका यावल येथील सावखेडेसिम ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांचे मनमानी कारभार
जळगाव (अलाउद्दीन तडवी) सावखेडे सिम ग्रामपंचायती बाबत संपूर्ण माहिती घेत संबंधित ग्रामसेवक नामे रमेश काटोके यांच्याबद्दल गावा तील लोकांकडून माहिती मिळविली असता संबंधित ग्रामसेवक हे आपले कार्यभार ग्रामपंचायतीचे कामकाज योग्यरीत्या पार पडत नसतात. वेळेवर ग्रामपंचायतीत हजर नसतात मोलमजुरी करून आलेल्या गरीब लोक जेव्हा ग्रामपंचायतीला भेट देण्यात जातात तेव्हा त्यांना निराशाजनक आपल्या कामाची पूर्तता न होता घरी परतावे लागते.
याची चौकशी करण्याकरता आपले जळगाव जिल्हा प्रतिनिधी हे त्या गावात आज दि. ७ मार्च २०२२ रोजी लोकांच्या माहितीवरतून ग्रामपंचायतीला भेट देण्यास गेले असता आज देखील तसेच घडले आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील काही लोक ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली होती परंतु त्याठिकाणी ग्रामपंचायतीला कुलूप लागलेले आढळले. या अगोदर देखील बीडिओकडे तोंडी तक्रारी देऊन देखील ग्रामसेवक रमेश काठोके हे ग्रामपंचायतीला उपस्थित नसतात लोकांना लाभापासून वंचित राहावे लागते तरीही संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी याकरिता गावातील लोक आपल्या न्यूज चैनल मार्फत त्यांना न्याय मिळेल अशी आशा बाळगतात.