अवकाळी पावसामुळे यावल तहसील कार्यालयाची पोलखोल
जळगाव (प्रतिनिधी) सुत्राद्वारे मिळालेल्या माहिती नुसार, ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना आपले काम करण्याकरिता तहसील कार्यालय यावल येथे यावे लागते. परंतु, आज असे काही घडले कि ग्रामीण भागातील लोक आपले काम घेऊन यावल तहसील येथे आले असता. यावल तहसील कार्यालय येथे लाईट नव्हती आणि ती नसल्याकारणाने आपले काम होवू शकत नाही असे त्यांना उत्तर मिळाले.
आज माहिती नुसार, नवीन बांधकाम झालेल्या इमारती मध्ये लाईट गेल्यानंतर पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याचे खंत वाटते आणि तसेच आज अवकाळी पावसाने हजेरी लावत यावल तालुक्यात धडक दिली आणि त्या कारणाने आज रोजी वीज पुरवठा खंडीत झाला होता. परंतु, तरी संबंधित कार्यालयांनी याची नोदं घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील लोकहि हातावर पोट धारक लोक असतात. त्यांना वारंवार येणे झेपत नसते आणि आता तर ते हि कठीण झाले आहे. बसेस चा संप असल्या कारणाने त्यांना रिक्षाने यावे लागते आणि त्याचे देखील भाडे वाढीव झाले आहेत. गोरगरीब लोकांना नाहक त्रास होत आहे. त्यांची फेरी वाया जाऊ नये याकरिता यावर योग्य उपाय योजना करावे.