भुसावळातील तीन दुकान फोडीतील आरोपी उत्तर प्रदेशातून बाजारपेठ पोलिसांनी घेतले ताब्यात
भुसावळ (अखिलेश धिमान) शहरात मागील महिन्यात बाजार पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी दारोडे भरदिवसा चोऱ्या तसेच औद्योगिक वसाहत मध्ये चोरी त्यात भर टाकणारी स्टेशन परिसरातील तीन कापड दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडल्याचे सत्र सुरू असलेले पोलिसांसमोर अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आव्हानच होते. पोलिसांचे तपास चक्र सुरू असल्याने तीन दुकान फोडीतील दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून भुसावळ बाजारपेठ पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी केशव मोहनलाल गेलानी वय ३७ धंदा- व्यवसाय. रा.जामनेर रोड सिंधी कॉलनी भुसावळ यांची हरिकृष्ण रेडिमेट शॉप व यांचे दुकाना शेजारील असलेले गुरूनानक शाॅप व गोपी शॉपिंग मॉल मध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून दिनांक २२/३/२०२२ रोजी रात्री १२:५२ वाजे सुमारास रेल्वे स्टेशन परिसरांमधून ३लाख ६६ हजार ७०० रुपयांचे मुद्देमाल चोरून पोबारा केले होते.
याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरंन १२८/२०२२ भादंवि ४५७/३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी कलुआ नवाब खान व.२३ रा. किशोर पाडा वृंदावन मथुरा उत्तर प्रदेश व श्याम कुमार प्रदीप सैनी व.२७ रा.अशा नगर मेहंदी पार्क मथुरा उत्तर प्रदेश मधून दिनांक ११/०३/२०२२ रोजी रात्री ९:०८ वाजेला ताब्यात घेतले व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक १४/०३/२०२२ रोजी घेऊन परतले व आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक १७/०३/२०२२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहे. सदरची कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड बाजारपेठ भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन पोलीस हवालदार विजय नेरकर, सचिन चौधरी, जीवन कापडे, सचिन पोळ यांनी मिळून केली.