जळगाव जिल्हा
गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे
नंदुरबार : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत राज्यस्तरीय योजनेअंतर्गत 139 महसूली उपविभागातून पात्र गोशाळेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेची अधिक माहिती, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच विहित नमुन्यातील अर्ज www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक गोशाळांनी विहित नमून्यातील अर्ज आपल्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे 6 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावे. ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.