भुसावळ शहरात दारोड्याचे प्रयत्नात असलेली टोळी पिस्टल व घातकशस्त्रासह पोलिसांनी केले गजाआड
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व भुसावळ पोलीस उपविभाग गावांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते.या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील नॅशनल हायवेवर गोलानी कॉम्प्लेक्स जवळील ब्रिज परिसरामध्ये काही आरोपी हे दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी सह व घातक शस्त्रांसह सह एकत्रित जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये,बाजार पेठ पोलीस स्टेशन, पोलीस नाईक यासीन पिंजारी,पोलीस नाईक रमण सुरळकर यांचे सह आरसीपी पथकातील स्टाफ ने मिळालेल्या गोपनीय माहितीची शहानिशा करणे कामी सदर ठिकाणी छापा टाकला असता एकूण पाच आरोपी संशयास्पद रित्या त्या ठिकाणी मिळून आले पोलीस आल्याची खबर लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्यातील पाचही आरोपी यांना पाठलाग करून पकडले.आरोपींची नावे खालील प्रमाणे:-
1) आफाक पटेल,वय 26 वर्षे राहणार खडका रोड,
2) सोमेश सोनवणे वय 28 वर्षे राकानगर,भुसावळ
3) नाविद शेख शकील शेख,ग्रीन पार्क भुसावळ
4)जितू पप्पू पिवाल,वाल्मिक नगर भुसावळ व अन्य एक वरील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एक देशी कट्टा व चाकू सारखे घातक हत्यार मिळून आले. पोलिसांना संशय बळावला व त्यांची अजून सखोल विचारपूस केली असता सदरचे आरोपी हे राष्ट्रीय महामार्गावर दरोडा घालण्याच्या पूर्व तयारीनिशी त्या ठिकाणी एकत्रित आल्याचे निष्पन्न झालेले आहे व त्याची त्यांनी कबुली दिली आहे.
आरोपींकडून देसी कट्टा, चाकू, २ मोटरसायकल काही संशयास्पद मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी भादवि कलम ३९९,४०२कलम ०३/२५शस्त्र अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे.सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस नाईक यासिन पिंजारी, पोलीस नाईक रमण सुरळकर यांनी केलेली आहे.