भुसावळ उपविभागात राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अवैध दारू विक्री वर एकाच दिवशी आठ ठिकाणी छापे
भुसावळ (प्रतिनिधी) धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व भुसावळ पोलीस उपविभाग गावांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाहिजे आरोपी अटक करणे अटकपूर्व जामीन आतील आरोपी अटक करणे,अवैध धंद्यांवर कारवाई करणे, अवैध अग्निशस्त्र तलवारी इत्यादी जप्त करणे हिस्ट्री सीटर चेक करणे, तडीपार गुन्हेगार चेक करणे , अशा विविध कारवाया करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार उपविभागातील चारही पोलिस स्टेशन मधील पोलीस प्रभारी अधिकारी, अन्य अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस अंमलदारांनी वेगवेगळ्या शीर्षकाखाली विविध कारवाया केल्या आहेत. त्यापैकीच अवैध दारू धंद्यांवर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दोन याप्रमाणे आठ कारवाया कालचा एकाच दिवशी करण्यात आलेल्या आहेत. कारवायांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे प्रकरणे.
तालुका पोलीस स्टेशन
1) गुन्हा रजिस्टर नंबर ३५/२०२२ कलम ६५ ई, ठिकाण- फौजी ढाबा, जप्त मुद्देमाल एकूण १५०४०/- रुपयाची देशी-विदेशी दारू
2) गुन्हा रजिस्टर नंबर ३६ / २०२२,आरोपीचे नाव महेंद्र अनिल चौधरी, राहणार गोजरा, हॉटेल आसरा कुऱ्हा शिवार,जप्त मुद्देमाल- १६०९०/- रुपयाची देशी-विदेशी दारू
बाजार पेठ पोलीस स्टेशन
1) गुन्हा रजिस्टर नंबर १९०/ २०२२ कलम ६५, आरोपीचे नाव होलाराम जीवनराम सचदेव, राहणार सिंधी कॉलनी
-घटनास्थळ हॉटेल अंगारा
-जप्त मुद्देमाल २८८० रुपयाची दारू
2) गुन्हा रजिस्टर नंबर १८५/ २२ कलम ६५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा
– आरोपीचे नाव दिलीप पांडुरंग पाटील राहणार गौतम नगर -घटनास्थळ गंगाराम प्लॉट -मुद्देमाल २६ लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत २५६०/-
नशिराबाद पोलीस स्टेशन
1) गु.र.नं.२२/२०२२ प्रोव्हि ६५ ई प्रमाणे मिळाला माल ६०० रु. कि .ची.१५ लिटर गा.ह.भ. ची दारु.
आरोपी- किरण सुरेश सपकाळे वय २८ रा.इंदीरानगर जळगाव खुर्द )
2) गु.र.नं.२३/२०२२ प्रोव्हि ६५ ई प्रमाणे मिळाला माल ७५० कि.ची.२५ लिटर गा.ह.भ. ची दारु.
आरोपी- गणेश हरचंद ठाकुर वय ४५ रा.इंदीरानगर जळगाव खुर्द )
भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील २ गुन्हे अवैध दारू विक्री विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री पडघन भुसावळ शहर पोलीस स्टेशन,पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे नशिराबाद पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, रुपाली चव्हाण, सपोनि अमोल पवार, सपोनि दुनगुहू, सपोनि गोंटला, सपोउनि गोसावी, सपोउनि चौधरी, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस नाईक यासिन पिंजारी,पोलीस नाईक रमण सुरळकर यांनी केलेली आहे.