जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून वाद झाल्याने गुन्हा दाखल !
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) भुसावळ शहरातील वरणगांव रोडवरील सुंदर नगर समोर हॉटेल पंजाब खालसा नावाच्या ढाब्यावर ओळखीच्या तरुणाने जेवण करून बिल देण्याच्या कारणावरून वाद झाल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी सारंगधर महादेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १८/०३/२०२२ रोजी ०५.१५ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील वरणगांव रोडवरील सुंदर नगर समोर हॉटेल पंजाब खालसा नावाच्या ढाब्यावर ओळखीचा अजिंक्य रमेश जैन व दुर्गेश बेंद्रे यांनी जेवण करून ३७५ रुपये देण्याच्या कारणावरून वाद घालून फिर्यादी सोबत अरेरावी करून दुर्गेश बेंद्रे याने दगड उचलून आणून उद्देशपूर्व फिर्यादी च्या डोक्यात मारून फेकून दुखापत केली तसेच दुर्गेश बेंद्रे याने फिर्यादीस दुखापत केल्यानंतर अजिंक्य जैन हा त्यास त्याच्या मोटरसायकल वर मागील बाजूस बसवून त्यास मदत करण्याचा उद्देशाने तेथून पळवून घेवून गेला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन १९८/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,५०६,३४ प्रमाणे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटली करीत आहे.