सावखेडा सिम येथील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्या उडवा-उडवीचे उत्तरांना ग्रामस्थ त्रस्त
जळगाव (अलाउद्दीन तडवी) सविस्तर लोककथीत माहितीनुसार तालुका यावल येथील ग्रामपंचायत सावखेडा सिम मधील लोकांमध्ये जॉब कार्ड मिळत नसल्या कारणाने नाराजगीचे वातावरण झाले आहे. जॉब कार्ड कामाशी निगडित रोजगार सेवक मोहम्मद तडवी आणि ग्रामसेवक रमेश काठोके हे लोकांची वारंवार दिशाभूल करतात त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात लोक ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्डची मागणी करण्यास गेले असता त्यांना जॉब कार्ड उपलब्ध नाही वरती मागणी केली आहे. ते आल्यावर आम्ही तुम्हाला देऊ अशी उत्तरे देतात.
संबंधित जॉब कार्डची मागणी लोक चार ते पाच महिन्यांपासून करत आहे तरी त्यांना ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड उपलब्ध नाहीत असेच उत्तर ऐकण्यास मिळते. लोक जॉब कार्ड च्या लाभापासून वंचित आहेत. तरी संबंधित विषयावर वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून जॉब कार्ड च्या पूर्तते करिता प्रयत्न करावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.