मुक्ताईनगर शहरामध्ये मटका चालतोय पुन्हा जोमाने
मुक्ताईनगर (सचिन झनके) शहरामध्ये चौफली वर परिवर्तन चौकाच्या लगतच असलेल्या काही हात गाड्यांमध्ये सट्टा चालत होता परंतु राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होत असताना नेमके अवैध धंदे कोणाचे असा प्रश्न उपस्थित राजकीय नेत्यांना झाला होता. तर स्थानिक पोलिस प्रशासन व एलसीबी पथकाद्वारे, नाशिक आयुक्त यांच्या पथकाकडून विविध प्रकारे सट्टा घेणारे अथवा सट्टा चालवणारे पिढीचे मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
परंतु अद्यापही सत्ता व मटका यांचा डाव थांबेना नेमके यांना पाठबळ कुणाचे ? आयजी पथकाकडून कारवाई होऊन सुद्धा नवा भिडू नवा राज प्रमाणे सट्टा जोमाने सुरू आहे. खत्री गल्ली मात्र बंद पडली परंतु बुऱ्हाणपूर रोडवरील रोहिदास नगरच्या कोपऱ्या वरती एका टपरीमध्ये मटका घेतला जातो व तसेच डेपो जवळ सुद्धा एका बंद अवस्थेत असलेली मोट्या टपरीमध्ये सुद्धा मालकच टपरीच्या बाहेर बसलेले असतात व आता मध्ये मोठ्या प्रमाणात सत्ता मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मुक्ताईनगर शहरामध्ये भ्रमणध्वनीद्वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जात आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा वर्तवली जात आहे. पोलीस प्रशासनला या बाबतीत माहीत नसेल काय असल्यास कारवाई का नाही, यावर स्थानिक पोलिस प्रशासन कारवाई करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.