२५ लाखांचा मद्यसाठा अक्कलकुवा पोलिसांनी जप्त केला जप्त
कोठार (राहुल शिवदे) गुजरात राज्यात अवैध विक्रीच्या उद्देशाने कंटेनर मध्ये भरलेला सुमारे २५ लाखाचा मद्यसाठा व सुमारे १६ लाखाच्या किमतीच्या कंटेनर असा एकूण सुमारे ४१ लाखाचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलिसांनी जप्त करत कारवाई २९ मार्च २०२२ रोजी पाच वाजेच्या सुमारास केली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९मार्च २०२२ रोजी अक्कलकुवा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नेत्रंग शेवाळी महामार्गावरील अक्कलकुवा शहरा जवळ असलेल्या हरी पॅलेस येथे कंटेनर क्रमांक एम एच ०४ जे यु ४१२५ क्रमांकाच्या संशयित कंटेनर पोलीस निरीक्षक पठाण पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील पोलीस नाईक अजय पवार देविदास विसपुते पोलीस कॉन्स्टेबल गिरीश सांगळे, संदीप महाले ,शरद पाटील यांनी कंटेनरची चौकशी केली केली. या कंटेनरमध्ये गुजरात राज्यात अवैधपणे मद्य घेऊन जात असल्याचे आढळले, कंटेनरला अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आणून बॉक्स मध्ये असलेल्या देशी, विदेशी मद्यासह बियर असा सुमारे अंदाजे २५लाखाच्या मद्यसाठा मिळाला तसेच कंटेनरची सुमारे सोळा लाख रुपये किंमत असे एकूण ४१ लाख रुपयांच्या मुद्देमाल मिळून आला. अक्कल्कुवा पोलीस ठाण्यात हा मद्यसाठा उतरवून रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पोलीस अधीक्षक पी .आर. पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत पोलीस निरीक्षक ईशामोद्दीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या पुढील तपास सुरू आहे.