जळगाव जिल्हा
सुकळी गावाच्या शेतकऱ्याला आदर्श पुरस्कार जाहीर
मुक्ताईनगर (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावचे सुपुत्र जयराज काशिनाथ पाटील अतिशय उपक्रम शिल शेतकरी आणि कष्टाळू व्यक्तिमत्व यांना जिल्हा परीषद मार्फत दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार आज मुक्ताईनगर पंचायत समिती येथे देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पारिवारिक सदस्य हजर होते आणि पंचायत समिती मुक्ताईनगर चे कृषी विस्तार अधिकारीकपिल सुरवाडे आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे सर्व बाजूंनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.