गल्ली नंबर सहा येथे बँक गल्लीत वाहतूक शाखेची धडक कारवाई
धुळे (विक्की आहिरे) शहरातील ग. नं. ६ मध्ये असलेल्या बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बँकेबाहेर लागणाऱ्या दुचाकींमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार शहर वाहतूक शाखेला मिळाल्यानंतर आज या ठिकाणी कारवाई करण्यात आली. जवळपास १४० वाहन धारकांकडून १२ हजारांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला.
यासंदर्भात माहिती अशी की, बहुतांश बँका या शहरातील ग. नं. ६ या ठिकाणी आहे. त्यातही जुने अमळनेर स्टॅण्ड ते पारोळारोड दरम्यानच्या परिसरातच बहुतांश बँका असल्याने तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्य नागरिकांची वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने तेथे वाहतुकीची कोंडी होते. याआधी देखील शहर पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून संबंधीत बँक व्यवस्थापनाला पार्किंग सुविधा करण्याची सुचना केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गेले तीन दिवस बँकांना सुटी असली तरी या ठिकाणी वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. तर आज तीन दिवसांनंतर बँकेचे कामकाज सुरू झाल्याने कामा निमित्त येणाऱ्यांची संख्याही वाढली होती. परिणामी, रस्त्यावर वाहने लागून संपुर्ण रस्ताच अडविला गेला. त्यामुळे वाहतुक शाखेने कारवाईची भुमिका घेतली. यात बहुतांश दुचाकीच होत्या. ही कारवाई शहर वाहतुक शाखेचे निरिक्षक धीरज महाजन, सहा. पोलीस निरिक्षक संगिता राऊत, पोउनि. आर. डी. जाधव, हे. कॉ. सुधिर सोनवणे, मतिन शेख, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर साळुंके, रमेश वाघ, उमाकांत खापरे, दिनेश चौधरी, किशोर गायकवाड यांच्या पथकाने केली