मोबाईल चोरटे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
भुसावळ (ओमशंकर रायकवार) भुसावळ शहरातील रेल्वे काॅलनी येथुन मोबाईल लंपास करणारे तीन आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दोन वर्षापूर्वी शहरातील पीओएच रेल्वे काॅलनी येथुन मोटरसायकलने मोबाईल हिसकावून नेले बाबत भुसावळ शहर पोलिस स्थानक भाग ०५ गुरनं ०४२७/२०२० भादंवि कलम ३९२/३४ प्रमाणे दि.२६ /०९/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुन पो.अधि.डाॅ.प्रवीण मुंढे, अ.पो.अधि. चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ मार्च २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा जळगांव चे पो.नि.किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन यांच्या कडील पथकातील पो.उ.नि.अमोल देवढे, स.फौ.अशोक महाजन ,पो.ह.सुनिल दामोदरे,पो.ह.लक्ष्मण पाटील,पो.ना.किशोर राठोड, पो.ना.रणजीत जाधव, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो.काॅ. विनोद पाटील, चा.पो.काॅ. मुरलीधर बारी, यांना योग्य सूचना देऊन सदर गुन्हातील आरोपितांचे शोध घेणे कामी पाठविण्यात आले होते. पथकातील सर्वांनी पीओएच काॅलनी येथे जाऊन संशयित आरोपी निकेश मधुकर वानखेडे (वय २३ रा. कंडारी), सिद्धांत अरुण म्हसके (वय २५ रा.पीओएच काॅलनी) आरबी-I-१९६२ ई व चोरीचा मोबाईल घेणारा सचिन मनोज जाधव (वय १९ रा.पाळधी ता.जामनेर) ह्या तीन्ही आरोपितांना बेड्या ठोकले व यांचाकडून सॅमसंग गॅलेक्सी A-३० असा मुद्देमाल ही जप्त करण्यात आले. पुढील कार्यवाही साठी त्यांना भुसावळ शहर पोलिस स्थानक येथे हजर करण्यात आले.