शिंदखेडा येथील आदिवासी वसतिगृहात प्रवेश रद्द केला म्हणून प्रकल्प अधिकारी व संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा यासाठी फिर्याद दाखल करण्यात यावा ; अर्ज सादर !
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह अनुसूचित जमाती साठी असुन दिलेले प्रवेश रद्द केला म्हणून आमरण उपोषण देखील करण्यात आले. परंतु तोंडी आश्वासन धमकीपोटी देवुन मागे घेण्यात आले. विदयार्थाना न्याय व संबंधित प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमिसे व संबंधित अधिकारी यांच्यावर संविधानिक नियमाचा अभ्यास न करता कारवाई केली म्हणून भारतीय दंड संहिता कलम 166 प्रमाणे अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत मुलांच्या संविधानिक सेवा व सवलती पासून वंचित ठेवल्याबददल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज आदर्श अनुसूचित जमाती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.गणेश सोनवणे यांच्या उपस्थितीत शिंदखेडा पोलीस स्टेशन ला फिर्याद तथा अर्ज प्र.पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना देण्यात आला.
त्यातुन आदिवासी वसतिगृह धुळे प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमिसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानकर, शिक्षण विस्तार अधिकारी भटु आव्वाड यांच्या विरुद्ध कायदेशीर भारतीय दंड संहितेच्या कलम 166 अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत व मुलांच्या संविधानिक सेवा आणि सवलती पासून वंचित ठेवल्याबददल कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.पोलिस प्रशासनाने संबंधित प्रकरणात लक्ष वेधून चौकशी करून संबंधित अधिकारी वर गुन्हा दाखल करण्यात यावा व वंचित विदयार्थाना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी केली.हयावेळी आदर्श अनुसूचित जमाती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.गणेश सोनवणे, अॅड.विशाल सोनवणे, विजय सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख नामदेव येळवे, महेश साळवे, राजधर सेना सावळे, समाधान मोरे, रवींद्र ईशी, कमलेश मगरे, सुभाष चुंचाळे, रवींद्र शिरसाठ, विद्यासागर सोनवणे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव उपस्थित होते.



