महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गुजरात शाखेचे उद्घाटन

सुरत (वृत्तसंस्था) गुजरात शाखेचे भव्य उद्घाटन सुरत येथे केंद्रीय सचिव शरद वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, उत्तर महाराष्ट्राचे विभागीय प्रमुख बटु भाऊ चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गुजरात राज्याचे अध्यक्ष प्रशांत चौधरी यांनी या उद्घाटनपर ओबीसी जनजागृती परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी छोटुभाई पाटील, सदस्य रेल्वे बोर्ड भारत सरकार, तसेच सुरत येथील नगरसेविका सर्वश्री रोहीनीबेन पाटील, चेअरमन बांधकाम समिती, वैशाली बेन पाटील नगरसेविका, नगरसेवक शरद पाटील, डॉ बलवंत पटेल, चेअरमन मस्करी हॉस्पिटल तथा नगर सेवक, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या सुरत शहर प्रमुख संगिताबेन चौधरी, हे विचारपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दुपट्टयाने स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात प्रशांत चौधरी यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महाराष्ट्रामध्ये केलेल्या कार्याच्या अनुषंगाने गुजरात मध्ये सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृह, तसेच ओबीसी मंत्रालय , ओबीसी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी महाज्योती सारखी संस्था गुजरातमध्ये निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ गुजरात प्रयत्नशील असेल, परंतु संघटन ही शक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या हक्काकडे सरकार चालढकल करीत राहील असे गुजराती भाषेत वक्तव्य केले.

छोटुभाई पटेल यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे कबूल केले. राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाष घाटे यांनी आपल्या बुलंद आवाजात ओबीसी समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला समजु दिले नाही, त्यामुळे कलम ३४० पासुन ओबीसी समाज पारखा झाला, त्यामुळे संविधान, आणि ओबीसी जनजागृती राष्ट्रीय ओबीसी महासंघाला करावी लागत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रीय सचिव शरद वानखेडे यांनी “केम छो गुजरात, मजा मा” जय ओबीसी या जयघोषाने करुन देशांतील ओबीसी समाजाला संघटन हाच आपल्या मुक्तीचा मार्ग असुन इतर कोणत्याही संघटनेचा व्देष करण्यापेक्षा आपले संघटन मोठे करणे हाच यावर उपाय आहे. ओबीसी समाजाची दशा आणि दिशा ठरविताना भुमिका ही महत्त्वाची घटक आहे, असे मत व्यक्त केले.

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष भटु चौधरी यांनी स्वताला बळकट करणे हाच महत्त्वाचा भाग आहे. कार्यक्रमाच्या आभार प्रसंगी संगिता बेन चौधरी यांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्या विचाराचा वसा गुजरातमध्ये निर्माण करण्याची गरज व्यक्त करुन सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी भरुच, आनंद, बडोदा, अहमदाबाद येथुन आलेल्या हितेश भाई अमीर, कैलाश गुप्ता, डॉ रामानंद गुप्ता, तृप्ती बेन, समाजसेवीका अल्पाबेन पटेल, कोरोना वारीअर्स दिलीपभाई ठाकोर, ओबीसी एकता क्षत्रिय संघाचे दादोजी ठाकोर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला २०० ओबीसी बंधु भगिनींनीं उपस्थिती दर्शविली. संचलन हेमंत चौधरी यांनी केले. गुजरात राज्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शाखा सर्वदूर निर्माण करू असे सर्वांनी मत व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे