अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची नॉनस्टॉप कमाई ; जगभरात कमावले ३०० कोटी
मुंबई (प्रतिनिधी) सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाने जगभरात किती कमाई केली आहे हे समोर आले आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला आहे.
भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘२०२१मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. या चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२२मध्ये देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने जवळपास २३.२३ कोटी रुपये कमावले आहेत.