आरोग्य व शिक्षणचोपडा
तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगराध्यक्षा व गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात लसीकरणावर भर
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुभाव रोखण्यासाठी नगराध्यक्षा मनिषा चौधरी व नगरपालिका गटनेते जीवन चौधरी यांनी कंबर कसली आहे. शहरातील प्रत्येक भागात विशेषतः मुस्लिम भागात स्वतः जाऊन घरा घरात जावून लसीकरणसाठी प्रबोधन करून लस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गोरगरीब वस्तीमध्ये जाऊन जनजागृती करून कॅम्पच्या माध्यमातून लसीकरण उपलब्ध करून देत आहे.
आज शहरातील लोह्या नगर, हमीद नगर, फकीर वाडा, दर्गा अली, आशा टॉकीज, के.जी.एन.कॉलनी येथे जाऊन प्रत्यक्षात लोकांना लसीकरणचे महत्व पटवून देत होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी कॅम्पमध्ये जाऊन लस घेण्यासाठी आग्रही करत आहे. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रमुख मुक्तार युसूफ सरदार,ठाकूर, सुधीर चौधरी, समाधान माळी, नगरपालिका कर्मचारी, आशा वर्कर्स, न.पा. डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते.