प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके यांचे कोलकात्यात निधन
कोलकाता : प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुण्ठ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केकेच्या मृत्यूच्या बातमीनंतर ट्विटरवरुन खेद व्यक्त केलाय.