अभिनेते किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत
मुंबई : अभिनेते किरण माने सतत चर्चेत असतात. ते सतत सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आजही असंच काहीसं झालं आहे. अभिनेता किरण माने यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहीत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
”महाराष्ट्रभर जाईल तिकडं लै लै लै प्रेम मिळतंय मला. भारावून गेलोय. हेरवाडला एक भगिनी आली आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाली,”तुमी लै आवडता आमाला.. तुमी नाय तर शिरेल बगायची बंद केली आमी. लै जीव तुटला आमचा तुमच्यासाठी. तुमाला वाईटसाईट बोलनार्या समोर आल्या तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन मी.” मी हसलो. म्हन्लो,”उलट आभार मानूया त्यांचे ताई. त्यामुळं मला कळलं तुम्ही किती अफाट प्रेम करता माझ्यावर. माफ करा त्यांना.”
…काल माणगांवच्या ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’च्या कार्यक्रमाआधी, आम्हा सर्वांना त्या ठिकाणाला भेट द्यायची उत्सूकता होती, जिथं डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी जिथं ‘माणगांव परीषद’ घेतली होती ! तिथं गेलो, तेवढ्यात मी आल्याची बातमी आंबेडकर भवनाच्या आसपासच्या घरांत पसरली. मला बघायला लोक घराबाहेर येऊन उभे राहीले…मनात आलं, तुमच्यासाठी व्हिडीओ काढावा ! बघा….”