मोठा माळीवाडा व फुलमाळी समाज पंच मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन उत्साहात साजरा
चोपडा (विश्वास वाडे) येथे मोठा माळीवाडा परिसरातील समाज बांधव व फुलमाळी समाज पंच मंडळाच्या वतीने मोठा माळीवाडा परिसरातील माळी समाज मंदिरात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक ज्योतिराव फुले व व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान फुल माळी समाजाचे अध्यक्ष नारायण बापू महाजन यांनी भूषविले त्याप्रसंगी सी बी माळी यांनी सावित्रीबाईंच्या त्या काळातील शिक्षणासाठी चाललेल्या धडपडीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या कार्याची महती विशद केली. समाजाचे उपाध्यक्ष पुंडलिक महाजन यांनी यावेळी आजही माळी समाजाला फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी शासन दरबारी झटावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. सदर शासन दरबारी ज्योतिराव व सावित्रीमाईंच्या या महान कार्याची लवकरच दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल असा आशावाद व्यक्त केला गेला. तसेच सुधीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित उपाध्यक्ष पुंडलिक महाजन सचिव सी बी माळी, खजिनदार दगडू माळी, नामदेव महाजन, दीपक महाजन, युवराज महाजन, बापू महाजन, रमेश माळी, छगन माळी, नवल महाजन, योगराज माळी, युवराज माळी, दशरथ महाजन, शालिक माळी, लक्ष्मण माळी, सुधीर, शरद माळी, नवल माळी, संतोष महाजन, आधार माळी, संतोष माळी, समाधान माळी, रोहिदास माळी तसेच समाजातील बंधू कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी बी माळी तसेच आभार समाधान माळी यांनी केले.