राज्य माय मराठी अध्यापक संघ उपाध्यक्षपदी विलास पाटील
चोपडा (विश्वास वाडे) महाराष्ट्राच्या माय मराठी राज्य अध्यापक संघाचे अध्वर्यू हनुमंतराव कुबडे पुणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शक अशोक तकटे, ज्ञानदेव दहिफळे, प्रिया निघोजकर, माय मराठी राज्य अध्यापक संघाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध कवी लक्ष्मणराव महाडिक (सेवानिवृत्त प्राचार्य -पिंपळगाव बसवंत), सचिव अनिल बोधे (प्राचार्य सातारा), माधुरी जोशी, नंदाभोर (मराठी पाठयपुस्तक मंडळ सदस्या) यांच्या निवड समितीने सर्वानुमते राज्याच्या माय मराठी अध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडीचे मुख्या. विलास पंढरीनाथ पाटील यांची निवड केली आहे.
विलास पाटील यांनी यापूर्वी इ.८वी मराठी पाठयपुस्तक समिक्षण समिती सदस्य -बालभारती पुणे, इ.९वी मराठी शिक्षकांसाठीची हस्तपुस्तिका समिती सदस्य, इ.९वी -१०वी मराठी शिक्षक हस्तपुस्तिका समिक्षण समिती सदस्य यावर काम केले असून राज्यमराठी कृतिसत्रात २ शोध निबंध सादर केले आहेत. तसेच चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या आयोजनाखाली राज्याचे मराठी विषयाचे कृतिसत्र उत्तम -यशस्वीरित्या पार पाडले आहे. तसेच नगर येथे संपन्न राज्य मराठी माध्य. शिक्षक कृतिसत्राचे मानाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या या निवडीनिमित्त संस्थाध्यक्ष अॅड. जी.के. पाटील, सचिव हितेंद्र देशमुख, म.सा.प. चोपडा संस्थापक कवी अशोक सोनवणे, अध्यक्ष मुख्याध्यापक पी.एस्. पाटील, मुख्या.गोपाल र. पाटील, मुख्या. संघ तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील, रोटरी अध्यक्ष पंकज बोरोले यांनी अभिनंदन केले आहे.