महाराष्ट्र राज्य शाळांची उन्हाळी सुट्टीत कपात
सटाणा (संभाजी सावंत) महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यात शनिवारी व रविवारी सुद्धा शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या महामारी कारणाने जवळ जवळ दोन वर्ष शाळाबंद होत्या. व काहीं प्रमाणात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु होता मात्र या शैक्षणिक सत्रात विद्यार्थांची प्रचंड हानी झाली. म्हणूनच हीच हानी भरून काढण्यासाठी आता उन्हाळी सुट्टया रद्द करुन शाळा पूर्ण वेळ सुरु ठेवण्यात आल्या आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता किती विदयार्थी हजर राहणार या बाबत शंका व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यताव सुसंगती आणण्यासाठी सन 2022 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक सत्र 2022-2023 मध्ये शाळा सुरु करण्याचे शासन निर्णय व परिपत्रक निर्गमित करण्यातबाबत विनंती करण्यात आली आहे.